काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 2 पोलिस हुतात्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 2 पोलिस हुतात्मा

सोपोर जिल्ह्यातील आरामपोरा इथं पोलिस आणि सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 2 पोलिस हुतात्मा

जम्मू काश्मीर - सोपोर जिल्ह्यातील आरामपोरा इथं पोलिस आणि सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलिस आणि सीआरपीएफचे जवान जखमी झाले आहेत. दोन पोलिस हुतात्मा झाले तर दोन नागरिकही मृत्यूमुखी पडले आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काही लोक जखमी झाले असून परिसरात सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरु आहे.

दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्यानं एकूण चार जणांना प्राण गमावावे लागले आहेत. यामध्ये दोन पोलिसांचा आणि दोन नागरिकांचा समावेश आहे. दोन पोलिस या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचा हात असल्याची माहिती काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी एएनआयशी बोलताना दिली. जखमी पोलिसांवर उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर परिसर सील करण्यात आला आहे.

loading image
go to top