esakal | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बिगरमुस्लिम टार्गेट का? डीजीपींनी सांगितलं कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu Kashmir

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बिगरमुस्लिम टार्गेट का? डीजीपींनी सांगितलं कारण

sakal_logo
By
सुधीर काकडे

जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या दहशतवादी कारावाया सुरू केल्याचे दिसते आहे. श्रीनगरच्या सफाकदल भागातील शासकीय मुलांच्या उच्च माध्यमिक शाळेत घुसून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची आज गोळ्या झाडून हत्या केली. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून, काश्मीरी पंडीत आणि बिगर मुस्लीम समुदाय काश्मीरमध्ये परत येताना दिसत आहे. याच गोष्टीमुळे पाकिस्तानमधून अतिरेकी हिंदू आणि शीखांविरोधात घातपाताचे कट रचत असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे. तसेच दहशतवादी खोऱ्यांत राहणाऱ्या अल्पसंख्यांक सामुदायामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कट रचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: लखीमपूर प्रकरणी दोघांना अटक; केंद्रीय मंत्र्याचा मुलगा बेपत्ता

पाकिस्तानकडून पुन्हा 1990 सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खोऱ्यामध्ये गेल्या तीन दिवसांत दहशतवाद्यांनी पाच नागरिकांचा बळी घेतला आहे. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची हत्या केली होती. त्यातच आज दहशतवाद्यांनी सफाकदल शालळेतील शिक्षकांवर गोळीबार केला. ज्यात शाळेच्या मुख्याध्यापक सुखविंदर कौर आणि शिक्षक दीपक यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: भाजप खासदाराच्या गाडीने चिरडल्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप; एक जखमी

दिलबाग सिंग म्हणाले की, मानवता, बंधुता, स्थानिक संस्कृती आणि मूल्यांवर हल्ला करणाऱ्यांचे चेहरे लवकरच समोर येतील. "एकापाठोपाठ झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो." आम्ही मागील घटनांचा तपास करत आहोत आणि श्रीनगर पोलिसांना अनेक लीड्स मिळाल्या आहेत. आम्ही या भ्याड हल्ल्यांमागील लोकांपर्यंत पोहोचू. मला खात्री आहे की पोलीस त्यांना लवकरच शोधून काढतील."

दशतवाद्यांकडून केले जाणारे हे हल्ले काश्मीरच्या मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहेत, असेही दिलबाग सिंग यांनी सांगितले. दहशतवादी पाकिस्तानच्या रणनितीनुसार काम करत आहेत आणि त्यांना काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करायची आहे. जेणेकरून काश्मीरमध्ये अशांतता निर्माण होईल. आम्हाला खात्री आहे की काश्मीरचे लोक त्यांचा हा कट यशस्वी होऊ देणार नाहीत. आम्ही एकत्र काम करू आणि त्यांचे कट उधळून लावू असा विश्वास यावेळी दिलबाग सिंग यांनी व्यक्त केला.

loading image
go to top