Rahul Gandhi : काश्मीरला हवाय रोजगार अन् प्रेम, पण भाजपने...; राहुल गांधींची मोदींवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi and Narendra Modi

Rahul Gandhi : काश्मीरला हवाय रोजगार अन् प्रेम, पण भाजपने...; राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार निशाणा साधला. केंद्रशासित प्रदेशाला रोजगार, चांगला व्यवसाय आणि प्रेम हवे होते, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्याऐवजी 'भाजपकडून काश्मीरला बुलडोझर देण्यात आलं, अशी टीका राहुल यांनी केली. (Rahul Gandhi News in Marathi)

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) सारख्या अनेक मोठ्या पक्षांनी या मोहिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच ही मोहिम त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. 7 जानेवारी रोजी महसूल विभागाचे आयुक्त सचिव विजय कुमार बिधुरी यांनी सर्व उपायुक्तांना सरकारी जमिनींवरील 100 टक्के अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील 10 लाख एकरहून अधिक जमीन अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली आहे.

राहुल गांधींनी ट्विट केले की, “जम्मू-काश्मीरला रोजगार, चांगला व्यवसाय आणि प्रेम हवे होते, पण त्यांना काय मिळाले? भाजपचा बुलडोझर." ते म्हणाले, "ज्या जमिनीवर तेथील जनतेने अनेक दशके मेहनत केली, ती जमीन त्यांच्याकडून हिसकावून घेतली जात आहे. तसेच या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे जनतेत रोष असल्याचं त्यांनी नमूद केलं.