पाकिस्तानातून पिझ्झा डिलिव्हरीच्या ड्रोनने IAF बेसवर हल्ला ?

चीनशी काय आहे कनेक्शन?
पाकिस्तानातून पिझ्झा डिलिव्हरीच्या ड्रोनने IAF बेसवर हल्ला ?
Updated on

श्रीनगर: जम्मूमध्ये इंडियन एअर फोर्सच्या बेसवर (iaf base attack) झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानच असण्याची दाट शक्यता आहे. कारण तपासात आतापर्यंत हाती आलेले धागेदोरे तसेच संकेत देत आहेत. पाकिस्तानने (pakistan) त्यांच्या देशात पिझ्झा (pizza delivery) आणि औषधांची डिलिव्हरी करण्यासाठी चीनकडून (china) मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स विकत घेतले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांना गुप्तचरांकडून ही माहिती मिळाली आहे. (Jammu attack Were drones bought from China for pizza delivery used by Pakistan?)

रविवारी एअर फोर्स बेसवर हल्ल्यासाठी या ड्रोन्सचा वापर झाला का? त्या दिशेने आता तपास सुरु आहे. भारतात प्रथमच ड्रोनद्वारे एखाद्या सैन्यतळावर अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला. ड्रोन हल्ल्याच्या प्राथमिक तपासात यामध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात दिसत आहे, असे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले.

पाकिस्तानातून पिझ्झा डिलिव्हरीच्या ड्रोनने IAF बेसवर हल्ला ?
मुंबई: बापानेच मुलांना आईस्क्रीमधून दिलं उंदिर मारायचं औषध

उच्च सुरक्षा असलेल्या एअर फोर्स स्टेशनच्या परिसरात पाच मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्बस्फोट झाले. एटीसी टॉवर आणि तिथे पार्क केलेल्या हेलिकॉप्टरला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात आल्याची शक्यता आहे. पहिल्या स्फोटात एकमजली इमारतीच्या छताचे नुकसान झाले, तर दुसरा स्फोट मोकळया जागेत झाला.

पाकिस्तानातून पिझ्झा डिलिव्हरीच्या ड्रोनने IAF बेसवर हल्ला ?
८० टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले, TIFR रिसर्च

"पाच ते सहा किलो वजनाच्या प्रत्येकी दोन IED मध्ये RDX मुख्य स्फोटक होते. ATC आणि हेलिकॉप्टरपासून जवळच हे दोन बॉम्ब टाकण्यात आले. चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केल्यामुळे हे बॉम्ब लक्ष्यापासून भरकटले किंवा हवेचा जोर जास्त असल्यामुळे हा हल्ला फसला" असे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

जम्मूमधील या एअर फोर्स स्टेशनपासून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ड्रोन्सचा वापर करुन भारताच्या हद्दीत १२ किमी आतापर्यंत शस्त्रास्त्र टाकण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com