
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भ्याड हल्ले सुरु केले आहेत. पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, पोखरण, फिरोजपूर येथे ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत, जे भारतीय संरक्षण यंत्रणेने हवेत पाडले. जम्मूसह इतर शहरांमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. जम्मू, पठाणकोट, पोखरण, पूंछ, सांबा इत्यादी ठिकाणी पूर्णपणे ब्लॅक आऊट आहे. सायरनचे आवाजही सतत ऐकू येत आहेत. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी जिथे आहे तिथून अधूनमधून स्फोटांचे आवाज येत आहेत.