District Magistrate issues major orders in Jammu as crisis deepens, highlighting administration’s urgent response to the situation.
District Magistrate issues major orders in Jammu as crisis deepens, highlighting administration’s urgent response to the situation.esakal

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Jammu Situation Turns Critical:माता वैष्णोदेवी मंदिर रस्त्यावर असलेल्या अर्धकुवारी येथे भूस्खलनामुळे सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला आहे
Published on

Jammu District Magistrate orders जम्मूमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. दोडा येथे ढगफुटी झाली आहे आणि अर्धकुवारी येथे भूस्खलनात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत हवामान लक्षात घेऊन जम्मूच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मोठे आदेश दिले आहेत. जम्मूच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी रात्रीच्यावेळी येण्याजाण्यावर बंदी घातली आहे.

जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. राकेश मिन्हास  यांनी सततच्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याचा इशारा आणि परिस्थिती लक्षात घेऊन रात्रीच्या वेळी हालचालींवर बंदी घातली आहे. आदेशानुसार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत रात्रीच्या वेळी कोणत्याही व्यक्तीच्या हालचालीवर बंदी असेल. कलम १६३ अंतर्गत ही बंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांना या बंदीतून सूट देण्यात येईल, तर इतर कोणत्याही व्यक्तीला सक्षम अधिकाऱ्यांच्या वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय हालचाल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाचे म्हणणे आहे की कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सार्वजनिक हिताची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

District Magistrate issues major orders in Jammu as crisis deepens, highlighting administration’s urgent response to the situation.
CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

याशिवाय, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिर रस्त्यावर असलेल्या अर्धकुवारी येथे भूस्खलनामुळे सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com