मोदींसाठी जम्मू-काश्‍मीरमधील सुवर्णकाराचं अनोखं गिफ्ट! तयार केलं तीन किलो अस्सल चांदीचं कमळ

Narendra Modi oath taking ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्‍मीरमधील एका सुवर्णकाराने अस्सल चांदीचे कमळ तयार केले आहे
Jammu jeweller crafts 3 kg silver lotus for Modi historic third term as PM Marathi News
Jammu jeweller crafts 3 kg silver lotus for Modi historic third term as PM Marathi News


जम्मू, ता. ९ (पीटीआय) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्‍मीरमधील एका सुवर्णकाराने अस्सल चांदीचे कमळ तयार केले आहे. भाजपचे पक्षचिन्ह असलेले हे कमळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे.रिंकू चौहान असे या सुवर्णकाराचे नाव असून तो मुठी या गावातील रहिवासी आहे.
चांदीचे हे कमळ बनविण्यासाठी रिंकू यांना १५ ते २० दिवस लागले. चौहान हे मागील नऊ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर भाजप युवा मोर्चाचे
प्रवक्तेपदाची जबाबदारी देखील आहे.

अयोध्येतील राममंदिराची निर्मिती, ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्‍मीरमध्ये दगडफेक थांबवणे आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेली विकासकामे पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवली आहेत त्यामुळे यासर्वांबद्दल कृतज्ञता म्हणून हे कमळ त्यांना देणार असल्याचे रिंकू यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना लवकरात लवकर भेटून हे कमळ भेट देता यावे अशी इच्छा रिंकू आणि त्यांची पत्नी अंजली यांनी व्यक्त केली आहे.

Jammu jeweller crafts 3 kg silver lotus for Modi historic third term as PM Marathi News
Narendra Modi Oath Ceremony : मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की... पदग्रहण करण्यापूर्वी का घेतली जाते शपथ? जाणून घ्या नियम

सुमारे तीन किलो चांदीचे हे कमळ मी स्वतः बनवले आहे, मला खात्री होती की नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणारच. त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली आहेत त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हे कमळ त्यांना भेट देणार आहे.
रिंकू चौहान, सुवर्णकार, जम्मू-काश्‍मीर

Jammu jeweller crafts 3 kg silver lotus for Modi historic third term as PM Marathi News
Modi Oath Ceremony : प्रतापराव जाधव यांच्या रूपाने जिजाऊंच्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पदाचा बहुमान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com