
हल्ल्यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला आहे.
श्रीनगरमधील चकमकीत पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
सोमवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगरमधील बेमिना भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तौयबाचे (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवादी ठार झाले. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला आहे. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) लक्ष्य करण्याचा त्यांचा हेतू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
श्रीनगरमध्ये नागरिकांवर सातत्यानं हल्ले होत असतानाच ही चकमक झालीय. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले, 'पाकिस्तानस्थित (Pakistan) मास्टर्सनं हल्ला करण्याच्या उद्देशानं पहलगाम अनंतनाग येथून स्थानिक दहशतवादी आदिल हुसैन मीरसह लष्कर-ए-तौयबाच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठवलं होतं.' तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन पोलिसांच्या (Jammu and Kashmir Police) हत्येमध्ये सहभागी असलेला लष्कर-ए-तौयबाचा दहशतवादी (Terrorist) आदिल पर्रे रविवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालाय. यासह जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या एकाच दिवसात तीन झालीय.
हेही वाचा: अमेरिका पुन्हा हादरलं; नाईट क्लबमध्ये गोळीबार, 2 ठार तर 4 जण गंभीर जखमी
एका पोलिस प्रवक्त्यानं सांगितलं की, श्रीनगरच्या बाहेरील भागात (क्रेसबल पालपोरा भाग) दहशतवादी हालचाली करत असल्याच्या माहितीच्या आधारे श्रीनगर पोलिसांचं एक विशेष पथक शोधासाठी तैनात करण्यात आलं होतं. झडतीदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यानं पोलिस दलावर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल गंदरबलचा रहिवासी आदिल पर्रे उर्फ अबू बकर नावाचा दहशतवादी ठार झाला. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की, पर्रे हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबाशी संबंधित दहशतवादी होता. आबिद खान सोबत पर्रे सप्टेंबर 2021 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि दोघंही गेल्या वर्षी 2021 मध्ये श्रीनगरच्या भागात नागरिकांवर आणि बाहेरील लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होते. दरम्यान, यावर्षी खोऱ्यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.
हेही वाचा: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तौयबाचे 5 दहशतवादी ठार
Web Title: Jammu Kashmir 2 Lashkar E Taiba Terrorists From Pakistan Sent To Target Amarnath Yatra Shot Dead
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..