Jammu & Kashmir: दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन जवान जखमी

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील माळवा येथे ही चकमक घडली
Terrorist attack
Terrorist attackSakal

जम्मू : बारामुल्ला येथे सुरु असलेल्या दहशतवाद्यांशी चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील माळवा येथे ही चकमक घडली असल्याची माहिती जम्मूचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितली.

दरम्यान रात्रीपासून बारामुल्ला येथील परिस्वानी येथे चकमक सुरु होती. जम्मू काश्मीरमधील बडगाम पोलिस आणि लष्कराचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत होते. ही कारवाई रात्रीपासून चालू असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितलं होत. त्यानंतर माळव्यात ही चकमक घडली असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सारख्या वाढत असून १६ एप्रिलला अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत एक लष्कराचा जवान शहीद झाला होता. बारामुल्ला जिल्ह्यातील घाटाच्या परिसरात याअगोदर काश्मीरी पंडीतांना काश्मीर सोडण्याचे पत्रही आले होते. ते पत्र लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेकडून आलं असल्याचं तेथील पंडीतांनी सांगितलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांनी १५ एप्रिलला बारामुल्ला जिल्ह्यातील एका गावच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली होती.

आज घडलेल्या कारवाईत तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले असून कारवाई सुरु असल्याचं जम्मू येथील पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com