esakal | चिदंबरम यांचे आयएसआय-नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, भाजप नेत्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

chidambaram main.jpg

चिदंबरम हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

चिदंबरम यांचे आयएसआय-नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, भाजप नेत्याचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर-  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. चिदंबरम हे चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी केली आहे. चिदंबरम यांचे आयएसआय आणि नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, असा आरोपही त्यांनी केला. रैना यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

रवींद्र रैना म्हणाले की, चिदंबरम आणि दिग्विजय सिंहसारख्या नेत्यांना देशाविरोधात बोलू दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पूत्र राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आणि येथील नागरिकांना अधिकार बहाल करण्यासाठी काँग्रेस सदैव मजबुतीने उभी असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने मनमानी आणि घटनाबाह्य पद्धतीने लागू केलेला कायदा मागे घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले होते. 

हेही वाचा- राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रप्रपंचावर अमित शहांचं भाष्य; म्हणाले...

यावर प्रतिक्रिया देताना रैना म्हणाले की, चिदंबरम यांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, असे म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच देशाच्या पाठीत सुरा खुपसला आहे. कलम 370, दहशतवाद, फुटिरतावाद आणि पाकिस्तान समर्थक विचारधारेचे जन्मदाते आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचाराचे प्रमुख कारण होते. चिदंबरम हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.