Jammu Kashmir : केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करणार 1800 अतिरिक्त CRPF जवान

काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांनंतर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे.
CRPF
CRPF Sakal

Additional 18 companies Of CRPF Deployed In J & K : जम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या अतिरिक्त १८ कंपन्या म्हणजेच १८०० जवान तैनात करण्याचा मोठा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

जम्मूतील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील वाढते दहशतवादी हल्ले आणि नागरिकांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या दोन दहशतवादी घटनांमध्ये दोन अल्पवयीन चुलत भावांसह सहा जण ठार झाले होते.  

त्याशिवाय सोमवारी आयईडीच्या स्फोटात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी रविवारी संध्याकाळी राजौरी परिसरात दहशतवाद्यांनी तीन घरांवर गोळीबार केला, ज्यात चार नागरिक ठार झाले होते, तर सहा जखमी झाले होते. 

CRPF
जम्मू-काश्मीर : चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक; पोलिसांवर हल्ल्याचा होता कट

राजौरी आणि परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच हल्ल्यामागे सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या हल्ल्यांनंतर माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. जम्मूच्या लोकांनी भाजपला मतदान केले, पण आता त्यांच्यावर हल्ले होत आहेत, मात्र, नागरिकांच्या सुरक्षेऐवजी भाजप केवळ तमाशा पाहत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com