

Jammu Kashmir Encounter: Lashkar-e-Taiba Commander Lateef Bhat Killed in Kulgam
esakal
Jammu Kashmir encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा कमांडर लतीफ भट ठार झाला आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान लतीफ एका मशिदीत लपून बसला होता. त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र, त्याने शरण येण्यास नकार दिला. सुरक्षा दलांनी विशेष काळजी घेत ही मोहीम पूर्ण केली. या कारवाईत मशिदीचे कोणतेही नुकसान झाले नाही.