Jammu & Kashmir : काश्‍मीरमध्ये अखेर हिम‘चैतन्य’वर्षाव; पर्यटकांनी गजबजली पर्यटनस्थळे, स्थानिकांना दिलासा

जम्मू-काश्‍मीरमधील नागरिक आणि येथे आलेले पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते त्या हिमवर्षावाला जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरुवारी सुरुवात झाली.
jammu kashmir falling snow tourist visit famous places residents get relief business
jammu kashmir falling snow tourist visit famous places residents get relief businessSakal
Updated on

- जावेद मात्झी

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील नागरिक आणि येथे आलेले पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते त्या हिमवर्षावाला जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरुवारी सुरुवात झाली. मागील दोन महिन्यांपासून जम्मू-काश्‍मीरमधील स्थानिक नागरिक हिमवृष्टीची वाट पाहात होते. गुरुवारी झालेल्या हिमवर्षावामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून येथे ‘हिमचैतन्य’ निर्माण झाले आहे.

हिमवर्षाव आणि पाऊस न झाल्याने येथील फलोत्पादन आणि शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता होती. हिमवर्षाव झाल्यामुळे येथील नागरिकांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच हिमवर्षावामुळे येथील गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.

दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावर ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. हिमवर्षाव न झाल्याने स्कीइंग आणि बर्फातील अन्य खेळांचा आनंद स्थानिकांना आणि पर्यटकांना घेता येत नव्हता मात्र गुरुवारी सुरू झालेल्या हिमवर्षावामुळे आता पर्यटकांना या क्रीडा प्रकारांचा अनुभव घेता येणार आहे.

त्याचप्रमाणे येथील महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा सामन्यांनाही आता सुरुवात होणार आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी देखील हिमवर्षावाला सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

‘‘मागील दोन महिन्यांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहात होतो. यंदाच्या हंगामात बऱ्याच काळापासून हिमवर्षाव झाला नसल्याने आम्ही सर्व चिंतेत होतो. पण अखेर हिमवर्षाव झाल्याने आम्ही सर्व आनंदात आहोत,’’ अशी प्रतिक्रिया येथील स्लेज मालकांनी व्यक्त केली आहे.

काश्‍मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीचा येथील पर्यटनावर मोठा परिणाम होते त्याचप्रमाणे येथील अर्थकारणही यावर अवलंबून असते. यंदा हिमवर्षावाला उशीर झाल्याने जम्मू-काश्‍मीरमधील नागरिक चिंतेमध्ये होते.

पर्यटनासाठी योग्य वेळ

जम्मू-काश्‍मीरमधील हिमवर्षावाची अनुभूती घेण्यासाठी हिवाळा हा योग्य ऋतू आहे... आम्ही ज्या कालावधीमध्ये काश्‍मीरमध्ये सहलीचे आयोजन केले, त्या कालावधीत येथे आम्हाला हिमवर्षाव अनुभवता आला याचा आम्हाला खूप आनंद आहे... येथील गुलमर्गला आम्ही अनुभवलेली बर्फवृष्टी ही निसर्गाने आम्हाला दिलेली अमूल्य भेट आहे...

प्रत्येकाने हा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा... अशा प्रतिक्रिया येथे आलेल्या पर्यटकांनी या वेळी व्यक्त केल्या. येथे पश्‍चिम बंगाल, पंजाब आणि हरियाना या राज्यांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आले आहेत.

आमच्यासाठी हिमवर्षाव म्हणजे येथील डोंगरांवर पसरलेली पांढरी दुलई नाही, तर आमची जीवनरेखा आहे. गुरुवारी सुरू झालेला हिमवर्षाव हा आमच्यासाठी दिलासा देणारा आणि आमच्या उपजीविका सुरक्षित असल्याची ग्वाही देणारा आहे.

- अली महमूद, पहलगाम, हस्तकला वस्तू विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.