

Jammu and Kashmir: Three CRPF Jawans Injured in Terrorist Firing at Kulgam Checkpost (representative image/ANI)
esakal
जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजार येथे बुधवारी (11 नोव्हेंबर) दुपारी संशयित दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) सुरक्षा चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्यात CRPF चे तीन जवान जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.