'जैशे'च्या दहशतवाद्याला पुलवामामध्ये अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

जम्मू : सुरक्षा जवानांनी आज पुलवामा जिल्ह्यात जैशे महंमद या संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. गुलजार दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्‍मीरचे मंत्री नईम अख्तर यांच्यावर गेल्या महिन्यात झालेल्या बॉंबहल्ल्यात दारचा समावेश होता.

जम्मू : सुरक्षा जवानांनी आज पुलवामा जिल्ह्यात जैशे महंमद या संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. गुलजार दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्‍मीरचे मंत्री नईम अख्तर यांच्यावर गेल्या महिन्यात झालेल्या बॉंबहल्ल्यात दारचा समावेश होता.

त्राल भागात या हल्ल्यात अख्तर वाचले असले तरी इतर तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 जण जखमी झाले होते. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हल्ल्यात सहभाग असल्याचे कबूल केले आहे. तसेच, पाकिस्तानमधील जैशे महंमदचा म्होरक्‍या मुफ्ती वकास याच्या सूचनेवरून काम असल्याचेही त्याने मान्य केले आहे. दारला पूर्वीही अटक होऊन सुटका झाली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे चार सहकारी त्राल भागातच लपून बसले आहेत. हे सर्व विदेशी दहशतवादी आहेत. यानंतर पोलिसांनी त्रालमध्ये मोठी शोध मोहिम सुरू केली आहे.

दुसऱ्या दिवशीही गोळीबार
पाकिस्तानी सैनिकांनी पूँच जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी आज सकाळी नियंत्रणरेषेवरील कृष्णा घाटी सेक्‍टरमध्ये गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिले असून, अखेरचे वृत्त हाती आले त्या वेळी गोळीबार सुरू होता. पाकिस्तानकडून काल (ता. 12) याच भागात झालेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर एक हमाल मरण पावला होता. पाकिस्तानच्या सततच्या गोळीबारामुळे या भागातील शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu-kashmir news jaish terrorist arrested in pulwama