जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी मोहिम; ११ दहशतवाद्यांना कंठस्नान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी मोहिम; ११ दहशतवाद्यांना कंठस्नान

sakal_logo
By
सुधीर काकडे

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता सुरक्षा दलांनी मोठी मोहिम सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. याअंतर्गत सुरक्षा दलांनी अनेक कारवाया केल्या आहेत. ८ ठिकाणी झालेल्या एनकाउन्टरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी आतापर्यंत ११ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. श्रीनगरमध्ये नागरिकांवर हल्ले केल्यानंतर सुरक्षा दलांच्या कारवाईच्या भितीने दहशतवादी आता दक्षिण काश्मीरमध्ये पळाल्याचे समजते आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर विभागाच्या छाप्यातून १८४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड

Jammu Kashmir Encounter

Jammu Kashmir Encounter

लष्कराने केलेल्या या कारवाईमध्ये वेगवेळ्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या शाहिद नावाच्या दहशतवाद्याची एके ४७ रायफल देखील जप्त केली. बेमिना येथे आज दुपारी झालेल्या चकमकीत टीआरएफ-एलईटीशी संबंधित एक स्थानिक दहशतवादी ठार झाला. हा दहशतवादी या ठिकाणी लपून बसलेला असताना सुरक्षा यंत्रणांनी त्याला आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. मात्र त्याने गोळीबार केला आणि पोलिसांच्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात तो ठार झाला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

सुरक्षा दलांना पुलवामाच्या वहीबग भागात अतिरेक्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती, त्यानंतर त्या परिसराला घेराव घालत शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक झाली या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला. श्रीनगर शहरात पाच दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांकडे होती, त्यातील दोन दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातले. तर उर्वरित तीन जणांच्या शोधात असून, लवकरच त्यांचा शोध घेऊ अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, या चकमकित लष्करातील एक अधिकारी आणि एक जवान देखील शहिद झाल्याची माहिती मिळाली आहे.

loading image
go to top