esakal | इतर राज्यातील पुरुषालाही होता येणार जम्मू-काश्मिरचा रहिवाशी
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu-Kashmir

जम्मू-काश्मीरबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता, जम्मू-काश्मिरमधील महिलांशी लग्न करणाऱ्या बाहेरील पुरुषालाही रहिवासी मानलं जाणार आहे.

इतर राज्यातील पुरुषालाही होता येणार जम्मू-काश्मिरचा रहिवाशी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता, जम्मू-काश्मिरमधील महिलांशी लग्न करणाऱ्या बाहेरील पुरुषालाही रहिवासी मानलं जाणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र शासित प्रदेशच्या डोमेसाईल कायद्यामध्ये बदल करत मोठा निर्णय घेतलाय. यामुळे केंद्र शासित प्रदेशातील मूळ रहिवाशी असलेल्या महिलेच्या पतीलाही निवासी पत्र दिले जाणार आहे. याआधी केंद्र शासित प्रदेशाच्या केवळ मूळ रहिवाशांना निवासी प्रमाणपत्र दिले जायचे. दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला यासाठी योग्य मानलं जायचं नाही. (jammu kashmir outsiders who marry a woman of the state will also be considered residents)

जम्मू-काश्मिरच्या केंद्र शासित प्रदेश सरकारने मंगळवारी केंद्र शासित प्रदेशच्या बाहेरील विवाहित साथीदारांना अधिवास प्रमाणपत्र जारी करण्याच्या अडचणींना नष्ट केले. त्यामुळे आता जम्मू-काश्मिरमधील महिलेशी लग्न केलेल्या, इतर राज्यातील व्यक्तीला रहिवाशी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जम्मू-काश्मीर रहिवाशी प्रमाणपत्र प्रक्रिया निमय, 2020 अंतर्गत नवा खंड जोडण्यात आला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरची रहिवाशी असलेल्या महिलेच्या पतीला काही कागदपत्रे जमा करुन रहिवाशी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. यामध्ये पत्नीचे रहिवाशी प्रमाणपत्र आणि लग्नासंबंधी कागदपत्रे द्यावे लागतील.

हेही वाचा: रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावरुन वाद; सोशल मीडियावर संताप

सरकारकडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, रहिवाशी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदाराला सक्षम अधिकारी समजण्यात येणार आहे. हा आदेश जीएडीचे आयुक्त/सचिव मनोज द्विवेदी यांनी जारी केला आहे. आतापर्यंत फक्त महिलांना राज्य सब्जेक्ट समजून डोमेसाईल दिलं जात होतं. दरम्यान, जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने केंद्र शासित प्रदेशात अनेक बदल केले जात आहेत. त्यातील हा एक आहे.

loading image