पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला...

वृत्तसंस्था
Thursday, 11 June 2020

भारत-पाकिस्तान सीमेवर चकमकी सुरू असून, पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपये, ड्रग्स आणि काही साहित्य जप्त केले. पाकिस्तानचा हा सर्वात मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.

श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवर चकमकी सुरू असून, पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपये, ड्रग्स आणि काही साहित्य जप्त केले. पाकिस्तानचा हा सर्वात मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.

हिंदवाडा पोलिसांनी कारवाई करत 3 जणांच्या मुस्क्या आवळल्या असून, ते लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम, ड्रग्स आणि काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 21 किलो हेरोइन आहे. बाजारात त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी ड्रग्स पुरवण्याचे काम हे तिघे करत होते.

हिंदवाडच्या पोलिस अधिकाऱयांनी सांगितले की, पकडण्यात आलेले तिन्ही दहशतवादी ड्रग्स विकून येणाऱ्या पैशांमधून दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याची माहिती पुढे आली आहे. तिघेही पाकिस्तानमधील दहशतवादी हँडलरच्या संपर्कात होते. शिवाय, लष्कर ए तोएबासाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu kashmir police arrested 3 people lashkar e taiba