

delhi blast
esakal
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या आय-२० कार स्फोटाने संपूर्ण देश हादरला. या घटनेत आठ जण ठार झाले, तर २० जण जखमी झाले. हा स्फोट अनवधानाने झाला असला, तरी त्यामागे जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेचे मोठे नेटवर्क कार्यरत होते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सतर्क तपासाने हे नेटवर्क उघडकीस आणले आणि देशाला आणखी मोठ्या हल्ल्यांपासून वाचवले. पाकिस्तानस्थित हँडलर्सशी जोडलेले 'व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल' उध्वस्त करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली.