Jammu Kashmir Tourism : जखमांवर फुंकर घालणारी मोहीम; ‘चला काश्मीर’द्वारे पर्यटनाला पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न
Kashmir Tourism : जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाने महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशनसोबत ‘चला काश्मीरला’ मोहीम सुरू केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
श्रीनगर : पर्यटनाला पुन्हा चालना देण्यासाठी जम्मू- काश्मीर पर्यटन विभागाने महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशन (एमटीओए) आणि जम्मू-काश्मीर हॉटेलियर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला काश्मीरला’ (कश्मीर चलो) ही मोहीम सुरू केली आहे.