

Jammu and Kashmir: Two SPO Personnel Shot Dead, Bodies Found in Forest; Weapons Missing
esakal
Jammu and Kashmir latest terror news: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची (SPO) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. डच्छन परिसरातून ११ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या या दोन्ही जवानांचे मृतदेह गुरुवारी शोधमोहिमेदरम्यान आढळले. रशपाल कुमार (४५) आणि बाब्बी चंद (५७) अशी मृत जवानांची नावे असून, दोघेही कियार डच्छन येथील रहिवासी होते.