esakal | Jammu: जैशे-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खातमा
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवाद्याचा खातमा

जम्मूत जैशे-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खातमा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैशे-मोहम्मदच्या वरिष्ठ कमांडरचा चकमकीत खातमा केला. त्राल परिसरातील तिलवानी मोहल्ला वाग्गडमध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहिम राबविण्यात आली.

दहशतवाद्यांनी दलावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जैशे मोहमदचा वरिष्ठ त्याचे नाव आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू आणि काश्मिरमध्ये १६ ठिकाणी घातलेल्या छाप्यात दहशतवाद्यांच्या चार साथीदारांना अटक केली. चौघेही श्रीनगरचे रहिवासी आहेत. ते दहशतवादी संघटनांसाठी भूमिगत राहून काम करत होते. जम्मू आणि काश्मिरसह, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट नुकताच उघडकीस आला होता.

loading image
go to top