बनावट ओटीपी आणि कस्टमर केअर नंबर; देशातील हजारोंना कसा लावला चुना

बनावट ओटीपी आणि कस्टमर केअर नंबर; देशातील हजारोंना कसा लावला चुना

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल इंटेलिजेन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटने फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सामील असणाऱ्या एका 'मल्टी कंपोनंट मॉड्यूल'चा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपी मास्टरमाईँड मोहम्मद अंसारी देखील समाविष्ट आहे. अलिकडच्या दिवसांमध्ये साबयर गुन्ह्यांचे केंद्र म्हणून नावारुपास आलेल्या झारखंडमधील जामताराचा तो रहिवासी आहे.

बनावट ओटीपी आणि कस्टमर केअर नंबर; देशातील हजारोंना कसा लावला चुना
'आझाद मैदानातील आंदोलन मागे; राज्यातील संपाचं काय करायचं ते कामगारांनी ठरवावं'

पोलिसांच्या सांगण्यानुसार, या टोळीने देशभरात एक हजारहून अधिक लोकांना चुना लावला आहे. पोलिसांनी याबाबतच्या कारवाईदरम्यान आरोपींकडून 26 फोन, एक लॅपटॉप, 156 सीम कार्ड आणि 111 एटीएम कार्ड जप्त केले आहेत. तसेच 111 बँक खाती देखील फ्रीज केलेली आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, ही टोळी गेल्या एका वर्षापासून अधिक काळ या प्रकारात गुंतलेली होती. या प्रकरणी आणखी लोकांची अटक होण्याची शक्यता आहे.

बनावट ओटीपी आणि कस्टमर केअर नंबर; देशातील हजारोंना कसा लावला चुना
शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

टेक्निकल तपास आणि ह्यूमन इंटेलिजन्समधून आढळलं की, हे मॉड्यूल देशभरात पसरलेले आहे. याबाबतचा पहिला छापा सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आला होता. तसेच सहा आरोपींना जे जामताराचे रहिवासी आहेत, त्यांना बेंगलुरुमधून अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंसारी जामतारामधूनच हे मॉड्यूल ऑपरेट करायचा. इतर राज्यांमध्ये कुणाला फसवण्यात येऊ शकतं, याबाबत निर्दश द्यायचा. तोच वेगवेगळ्या मॉड्यूल्सच्या संपर्कात असायचा मात्र, हे मॉड्यूल्स एकमेकांच्या संपर्कात नसायचे. त्याला पश्चिम बंगाल आणि बेंगलरुमध्ये छापेमारी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com