shakti mill gang rape : आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल बदलला आहे.

शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल बदलला आहे. मुंबई सत्र न्यायालायने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा बदलून ती जन्मठेपेत बदलली.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणाने मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी सर्वच स्तरातून उमटली होती. 2013 मध्ये घडलेल्या या घटनेतील क्रूरकर्मे विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अंसारी यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, या शिक्षेला या आरोपींनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं.

मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. आज सुनावनीसाठी आरोपींना VC द्वारे हजर केले गेले. तर राज्यसरकारचे वकिल दिपक साळवी हे देखील या सुनावनीला ऑनलाईन उपस्थित होते.

loading image
go to top