Bihar Election 2025: ‘जनसुराज’ने जाहीर केली ५१ उमेदवारांची यादी; विविध समाजवर्गांचा समावेश
Jan Suraaj Party: जनसुराज पक्षाने पाटण्यात ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली असून विविध सामाजिक गटांचा समावेश आहे. संस्थापक प्रशांत किशोर यांनी निधी गोळा करण्यासाठी मोबाईल ॲप लाँच केले आहे.
पाटणा : जनसुराज पक्षाने आज ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांमध्ये अनुसूचित जातींमधील सात, अतिमागास वर्गातील १७, मागासवर्गातील ११, अल्पसंख्याक समाजातील आठ आणि सर्वसाधारण गटातील आठ जणांचा समावेश आहे.