Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Mumbai Crime: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या एका तरूणीवरती ज्वलनशील पदार्थ टाकून चोरी केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeEsakal

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या एका तरूणीवरती ज्वलनशील पदार्थ टाकून चोरी केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. दोन चोरांनी तरूणीवरती ज्वलनशील पदार्थ टाकला त्यानंतर तिच्याजवळ असलेला लॅपटॉप चोरी केला. मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या तरूणी यूपीएससीच्या परिक्षेची तयारी करत होती. ही घटना कल्याण परिसरात घडली आहे. आरोपींनी तरूणी एकटी असताना तिच्यावरती ज्वलनशील पदार्थ टाकला आणि तिचा लॅपटॉप घेऊन ते पसार झाले.

यासंबधीची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहणाऱ्या तिच्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी आली होती. ही तरुणी कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पार्किंगमध्ये आली होती. दरम्यान, दोन अनोळखी तरुण तिच्याजवळ आले. तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला. तिने डोळे मिटताच चोरट्यांनी तिच्याकडील लॅपटॉप हिसकावून पळ काढला.

Mumbai Crime
Sharad Pawar: 'मी शरद पवारांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी नाही...',अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं भाष्य म्हणाले, 'सुप्रिया अन् अजित यांच्यात...'

तर तरूणीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने ती जखमी झाली होती, तिला उपचारांसाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही तरूणी यूपीएससीच्या परिक्षेची तयारी करत आहे. तिने त्यासाठी क्लास देखील लावला आहे. तिने अभ्यासासाठी कल्याणमध्ये राहणाऱ्या तिच्या मित्राकडून लॅपटॉप नेला होता. कल्याण पुर्वेकडील लाकग्राम परिसरात तरूणीचा सहकारी राहतो.

Mumbai Crime
J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

तरूणीने घटनेची माहिती देताना सांगितले की, ती क्लासहून लोकलमधून कल्याण येथे आली होती. ती जेव्हा लोकलमधून उतरून याकल्याण पुर्वेला बाहेर पडली तेव्हा कोणीतरी तिच्या अंगावर काहीतरी टाकल्याचं जाणवलं. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिच्या तोंडातून शब्द फुटेनाच. तिच्याकडे असलेली बॅग, त्यातील लॅपटॉप, आणि हार चोरीला गेलं होतं. तिने घातलेला ड्रेस खराब झाला होता. तिची ओढणी जळाली होती.

कोळसेवाडी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

या घटनेनंतर पीडित तरुणीनं कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

Mumbai Crime
Arvind Kejriwal : केजरीवाल पुन्हा रस्त्यावर;‘आप’चा मोर्चा आज भाजप मुख्यालयावर धडकणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com