esakal | सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बवरुन जावडेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash_Javadekar

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावरुन पत्रकार परिषद घेऊन सरकारला टार्गेट केले असून महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बवरुन जावडेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांनी नुकताच लेटरबॉम्ब टाकत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. यावरुन आता भाजपाने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावरुन पत्रकार परिषद घेऊन सरकारला टार्गेट केले असून महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जावडेकर म्हणाले, "पोलिसांकडून पैसे गोळा करा, लुटा आणि वसुली करा हेच महाराष्ट्र सरकारचा एकमेव कार्यक्रम आहे. पोलिसांनी बॉम्ब ठेवला हे पहिल्यांदाच पाहिलं गेलं" तसेच सचिन वाझे आणि शिवसेनेचं नातं काय? हे सांगण्याचा पयत्न करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांचा व्हिडिओ देखील पत्रकार परिषदेत दाखवला. तसेच ज्याच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत त्याचं कौतुक केलं जात होतं असा आरोपही यावेळी जावडेकर यांनी केला.

दरम्यान, सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहमंत्र्यांबद्दल धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक बारमधून तीन साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्याची यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा आरोपही यावेळी जावडेकर यांनी केला.

loading image