esakal | पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

बोलून बातमी शोधा

Jawan Killed In Pak Shelling Along Line of Control In J&K

कठीण परिस्थितीतही पाकिस्तानच्या कुडघोड्या सुरु असून या कुरघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले असून यावेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद
sakal_logo
By
वृत्तसंस्था

राजौरी : कठीण परिस्थितीतही पाकिस्तानच्या कुडघोड्या सुरु असून या कुरघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले असून यावेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राजौरी भागातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानी सैनिकाला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचं प्रमाणही वाढत आहे. घुसखोरांविरोधात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. एकीकडे घुसखोरांविरुद्धची कारवाई आणि कोरोनाचं आव्हान असतानाच आता पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला आहे.

कोरोना व्हायरसचं जगभरात थैमान सुरू असतानाच पाकिस्तानच्या कुरघोड्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यात भारत-चीन तणावाचं वातावरण आणि हवामानातील बदल होत असताना सातत्यानं पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना दिसत आहे. दरम्यान कोरोना व्हायरस, भारत चीन संघर्ष, सीमेपलिकडून होणारं शस्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला होणारं नुकसान या सगळ्याच आव्हानांना भारत एकाच वेळी समोर जात आहे.