सुनील गुजर यांच्या मृत्यूच्या या बातमीने संपूर्ण गाव सुन्न झाला आहे. सुनील यांचे जन्मगाव व सासरवाडी हे एकच आहे. त्यांचे सासरे आबाजी पाटील माजी सरपंच, तर सासू कलम पाटील सरपंच आहेत.
बांबवडे : शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २७) यांचा मणिपूर येथे सेवा बजावत असताना डोजर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात (Dozer Accident) मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.