Rajya Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024 sakal

Rajya Sabha Election 2024 : जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी ; समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे केली जाहीर

समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली असून यात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली असून यात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

जया बच्चन यावेळी तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत जातील, असे बोलले जात होते. परंतु समाजवादी पक्षानेच त्यांना दुसर्यांदा उमेदवारी दिली आहे. दुसर्या दोन उमेदवारांमध्ये माजी खासदार रामजीलाल सुमन व आलोक रंजन यांचा समावेश आहे.

Rajya Sabha Election 2024
Sagarika Ghose On Rajya Sabha : राजकारणात जाणार नाही म्हणाणाऱ्या सागरिका घोष तृणमूलमध्ये; राज्यसभेचं मिळालं तिकीट

रामजीलाल सुमन हे उत्तर प्रदेशातील दलित नेते म्हणून प्रसिद्ध असून त्यांचा आग्रा व अलिगड या भागांमध्ये चांगलाच प्रभाव आहे. त्यांना उमेदवारी देऊन दलित मतांवर नजर ठेवली आहे. त्याचप्रमाणे माजी सनदी अधिकारी राहिलेले आलोक रंजन यांना पहिल्यांदाच समाजवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com