Jaya Bachchan vs Jagdeep Dhankhar Video
Jaya Bachchan vs Jagdeep Dhankhar Video

Video : बच्चन आणि गांधी आले एकत्र..! उपराष्ट्रपतींचा जया बच्चन यांच्याशी पुन्हा वाद, विरोधी पक्षाने केले वॉकआऊट

Jaya Bachchan vs Jagdeep Dhankhar Video Latest News : जया बच्चन यांचा उल्लेख सभापती जगदीप धनखड 'जया अमिताभ बच्चन' असा करतात यावरून सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे.
Published on
Summary

राज्यसभेत जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. जया बच्चन यांचा उल्लेख सभापती जगदीप धनखड 'जया अमिताभ बच्चन' असा करतात यावरून सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे. यादरम्यान जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. जया बच्चन यांनी धनखड याच्या बोलण्याच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. यावर धनखड यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. या वादादरम्यान काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी जया बच्चन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com