वीज चोरी करणं भोवलं! माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध FIR दाखल; JDS कार्यालयाबाहेर लागले अपमानास्पद पोस्टर

एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात वीज चोरीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
HD Kumaraswamy Karnataka Police
HD Kumaraswamy Karnataka Policeesakal
Summary

एफआयआर दाखल झाल्यानंतर लगेचच धजदच्या कार्यालयावरील भिंतीवर 'वीजचोर कुमारस्वामी' असे अपमानास्पद पोस्टर चिकटविण्यात आल्याचे दिसून आले.

बंगळूर : माजी मुख्यमंत्री आणि धजदचे (JDS) प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांच्याविरोधात वीज चोरीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेस्कॉम अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे जयनगर दक्षता पोलिस ठाण्यात (Karnataka Police) एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा मंगळवारी (ता. १४) घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. एईई प्रशांतकुमार यांनी फिर्याद दिली होती. काँग्रेसने आरोप केला होता, की एच. डी. कुमारस्वामी यांनी बंगळूरमधील जे. पी. नगर येथील त्यांच्या निवासस्थानी थेट दिवाळीच्या दिव्याला वीज जोडली होती. काँग्रेसने याबाबत व्हिडिओ आणि फोटोसह ट्विट केले होते.

HD Kumaraswamy Karnataka Police
Loksabha Election : लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन! 'या' खासदारांचं कापणार तिकीट, कोणाला मिळणार संधी?

यापूर्वी कुमारस्वामी यांच्या घरी जाऊन बेस्कॉम अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. त्यानंतर बेस्कॉमचे कार्यकारी अभियंता सुधाकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, घरातील दिवाबत्तीसाठी बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन घेतले होते. त्याची पडताळणी करण्यात आली आहे.

आम्हाला अतिरिक्त तपासदेखील करणे आवश्यक आहे. हे केवळ दंडाद्वारेच शिक्षापात्र आहे. आम्ही सर्व माहिती आमच्या वरिष्ठांना देऊ. कुमारस्वामी यांनी आपली चूक मान्य केली. आता आम्ही तपास करत असताना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

HD Kumaraswamy Karnataka Police
Raju Shetti : ..म्हणून ते ED च्या भीतीने इकडे-तिकडे उंदरासारखे पळत सुटलेत; राजू शेट्टींचा कोणावर निशाणा?

धजद कार्यालयावर पोस्टर्स

कुमारस्वामी यांच्याविरुद्ध वीजचोरीच्या आरोपावरून एफआयआर दाखल झाल्यानंतर लगेचच धजदच्या कार्यालयावरील भिंतीवर 'वीजचोर कुमारस्वामी' असे अपमानास्पद पोस्टर चिकटविण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजकंटकांनी कुमारस्वामींची खिल्ली उडवण्यासाठी पोस्टर लावले. 'कुमारस्वामी सध्या फक्त २०० युनिट्स वीज मोफत आहे. आणखी चोरी करू नका, असे पोस्टर्सवर लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com