मोदीजी, विद्यार्थी आपलं भवितव्य आहेत, मायभूमीत त्यांना लवकर परत आणा; जयंत पाटलांची हाक I PM Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेत - जयंत पाटील

'मोदीजी, विद्यार्थी आपलं भवितव्य आहेत, मायभूमीत त्यांना लवकर परत आणा'

युक्रेनमध्ये (Ukraine) प्रचंड अस्थिरतेची स्थिती असून रशियाकडून (Russia) युद्ध छेडलं जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा खुद्द युक्रेनकडूनचं करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांना सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतावं अस आवाहनं भारतीय दुतावासानं (Indian Embassy) केला होतं. दरम्यान, आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली आहे. त्यांनी ट्वीटरला तशी एक पोस्ट लिहली आहे. (ukraine-russia war)

यात जयंत पाटील (Jayant Patil) म्हणतात, रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना मदत हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या, आणि यासाठी योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे.

हेही वाचा: रशिया-युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण; भारताने स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने युध्द सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरिकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोरांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी अडकलेले विद्यार्थी हे आपले भवितव्य असून त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केलं आहे.

भारतीय दुतावासानं संदेशपत्र लिहलं आहे..

भारतीय दुतावासानं (Indian Embassy) संदेशपत्रात म्हटलं आहे की, सध्याची युक्रेनमधील अनिश्चिततेची स्थिती पाहता इथं असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना इथं राहणं गरजेचं नाही त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मायदेशी परतावं. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की युक्रेन अंतर्गत सर्व प्रकारचे अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावेत. भारतीय नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या वास्तव्याबाबत भारतीय दुतावासाला माहिती द्यावी. यामुळं दुतावासाला भारतीयांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा पुरवण्यात येईल, असंही या संदेशपत्रात लिहिलं आहे.

हेही वाचा: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून एअर लिफ्ट.... 

Web Title: Jayant Patil Twitter Post To Pm Modi On Ukraine And Russia War Indian Student

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top