UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RameshChnd Upadhyay
UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

नवी दिल्ली : मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या निवृत्त मेजर रमेशचंद उपाध्याय (Ramesh Chandra Upadhyay) यांना नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेडनं (JDU) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election) उमेदवारी जाहीर केली होती. परंतू या उमेदवारीवरुन टीका व्हायला लागल्यानंतर जेडीयूकडून त्याचं नाव मागे घेण्यात आलं असून नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतू उपाध्याय यांच्या जागेवर अद्याप नवा उमेदवार जाहीर केलेला नाही. (JDU drops name Ramesh Chandra Upadhyay in their candidate list for UP Assembly Election)

रमेशचंद उपाध्याय यांनी सन २०२० मध्ये जदयूमध्ये प्रवेश केला होता. पक्षाचे ते सक्रीय सदस्य असल्यानं त्यांना यंदाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बलियामधल्या बैरिया विधनसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. २० जागांच्या पहिल्या यादीत उपाध्याय यांचं नाव होतं. मात्र, उपाध्याय यांच्या उमेदवारीवरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्यानं तसेच माध्यमातून याची चर्चा झाल्यानं जदयूनं तातडीनं त्यांची उमेदवारी मागे घेतली. पण या जागेवारील दुसरा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. जदयूनं उपाध्याय यांच्याकडे उत्तर प्रदेशातील माजी सैनिकांसाठी कार्यरत असलेल्या विभागाचं राज्य संयोजकपद देण्यात आलं होतं.

हेही वाचा: कोरोनाच्या नियमाचं पालन करणं हा राष्ट्रधर्म - राष्ट्रपती

नाशिकमधील मालेगाव येथे सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानं देश हादरला होता. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता, तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. एटीएसनं केलेल्या तपासात या स्फोटामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे पुरावे समोर आले होते. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि मेजर रमेशचंद उपाध्याय हे प्रमुख आरोपी आहेत. सध्या हे तिघेही जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

Web Title: Jdu Drops Name Ramesh Chandra Upadhyay In Their Candidate List For Up Assembly Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top