esakal | आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ
sakal

बोलून बातमी शोधा

JDU MLA Gopal Mandal

आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

दिल्ली : बिहारच्या सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे ​​(जेडीयू) आमदार गोपाल मंडल (JDU MLA Gopal Mandal) हे एका वादात सापडले आहेत. गोपाल मंडल हे काल तेजस राजधानी एक्सप्रेसमध्ये राजेंद्र नगर (पाटणा) येथून नवी दिल्लीला जात होते. या दरम्यान, ट्रेनमध्ये ते आपले कपडे काढून अंडरवियर-बनियानवरच फिरत असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान मंडल यांना कपडे काढून फिरताना पाहून रेल्वेत प्रवास करत असलेल्या अन्य प्रवाशाने आक्षेप घेत त्यांना कपडे घालायला सांगितले. मात्र आमदारांनी त्या प्रवाशालाच शिवीगाळ केली.

नेमके काय घडले?

गोपाल मंडल हे तेजस राजधानी एक्सप्रेसच्या ए -1 डब्यात प्रवास करत होते. त्याच डब्यात जहानाबादचा रहिवासी प्रल्हाद पासवान आपल्या कुटुंबासह नवी दिल्लीला जात होते. तेवढ्यात त्यांनी जेडीयूच्या आमदाराला कपडे काढून आणि फक्त अंतवस्त्रांमध्येच फिरताना पाहिले. त्यानंतर प्रल्हाद यांनी सोबत महिला प्रवासी असल्याने या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यावर आमदार चिडले आणि प्रल्हादला शिवीगाळ करू लागले. लवकरच प्रकरण वाढले आणि संपूर्ण कोचमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर तेथे असलेल्या आरपीएफ टीमने पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेशनच्या रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान असे फिरत असण्याचे कारण ट्रेनमध्ये चढल्याबरोबर त्यांचे पोट घराब झाले होते असे गोपाल मंडल यांनी एएनआयला बोलताना सांगीतले. तसेच या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान दोन्ही संघाकडून खेळणारा क्रिकेटर माहितीये?

loading image
go to top