esakal | भारत-पाकिस्तान दोन्ही संघाकडून खेळणारा क्रिकेटर माहितीये?
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

भारत-पाकिस्तान दोन्ही संघाकडून खेळणारा क्रिकेटर माहितीये?

sakal_logo
By
सुशांत जाधव

क्रिकेटच्या मैदानात काही मोजक्या खेळाडूंच्या नावे दोन देशांकडून प्रतिनिधीत्व करण्याचा हटके विक्रम आहे. त्यातील एका क्रिकेटरने भारताकडून कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आणि ज्यावेळी त्याने क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तो खेळाडू पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग होता. कसोटी क्रिकेटमधील सर्वात वयोवद्ध खेळाडूचा विक्रम आपल्या नावे नोंदवणाऱ्या अमिर इलाही (Amir Elahi) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करुन शेवटचा सामना हा भारताकडूनच खेळला होता.

1 सप्टेंबर 1908 मध्ये जन्मलेल्या इलाही यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून क्रिकेट खेळले. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी भारताकडून तर फाळणीनंतर पाकिस्तानकडून ते क्रिकेटच्या मैदानात उतरले होते. लाहोरमध्ये जन्मलेल्या या क्रिकेटरने पाकिस्तानकडून केवळ 6 कसोटी सामने खेळल्याची नोंद आहे. 1952 मध्ये पाकिस्तान संघाने पहिला कसोटी सामना जिंकला होता. विशेष म्हणजे भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अमिर इलाही देखील पाकिस्तान संघात होते.

हेही वाचा: तुझ्या धैर्याला तोड नाही; अजिंक्यच्या बायकोची भावूक पोस्ट

अमिर इलाही यांनी 1947 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत भारताकडून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. गोलंदाजीच्या जोरावर त्यांना टीम इंडियात स्थान देण्यात आले होते. पण तत्कालीन कर्णधार लाला अमरनाथ यांनी गोलंदाज म्हणून त्यांचा वापरही करुन घेतला नाही. डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात भारताने 81 धावांची आघाडी घेतली होती. पावसामुळे हा सामना अनिर्णितच राहिला.

हेही वाचा: Paralympics : अनंत आमुची ध्येयासक्ती अन् आशा!

अमीर इलाही यांनी पदार्पणाच्या सामन्यात बॉलिंग केली नसली तरी पहिल्या डावात 10 व्या क्रमांकावर येऊन 4 धावा तर दुसऱ्या डावात वीनू मंकड यांच्यासोबत टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना 13 धावा केल्या होत्या. 12 डिसेंबर 1952 रोजी भारताविरुद्ध खेळलेली कसोटी त्यांच्यासाठी शेवटची होती. 28 डिसेंबर 1980 रोजी या दिग्गज क्रिकेटरने जगाचा निरोप घेतला होता.

loading image
go to top