
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत कोटा इथं राहणाऱ्या १८ वर्षीय रजित गुप्तानं ३६० पैकी ३३२ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. सहावीत असतानाच रजितने जेईईची तयारी सुरू केली होती. त्याच्या आई-वडिलांनी एका कोचिंग प्रोग्रॅममध्ये त्याला प्रवेश घेऊन दिला होता. इतक्या कमी वयात जेईईचा क्लास सुरू केल्यानं भक्कम असा पाया तयार झाला.