esakal | जेईई मुख्य परीक्षा, मे २०२१ स्थगित; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

बोलून बातमी शोधा

JEE-Exam
जेईई मुख्य परीक्षा, मे २०२१ स्थगित; शिक्षण मंत्र्यांची घोषणा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात वाढत्या कोविड-१९च्या (Covid-19) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणारी संयुक्त प्रवेश परीक्षेची (जेईई-मुख्य) (JEE Mains May-2021) सेशन्स स्थगित करण्यात आली आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशांक (Ramesh Pokhariyan Nishank) यांनी मंगळवारी ही घोषणा केली. तसेच या परीक्षांच्या पुढील तारखा येत्या काळात जाहीर होतील पण यासाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला (official website) सातत्याने भेट द्यावी, असं आवाहनही पोखरीयाल यांनी ट्विटद्वारे केलं आहे. (JEE Main May 2021 session has been postponed says Central Education Minister)

मे महिन्यात होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेची सेशन्स २४, २५, २६, २७, २८ मे २०२१ या तारखांना निश्चित करण्यात आली होती. पण देशातील सध्याची कोविडच्या उद्रेकाची परिस्थिती पाहता या सर्व तारखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असं नॅशन टेस्टिंग एजन्सीनं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये २७, २८, आणि ३० तारखेला होणारे सेशन्सही कोविडच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत.

हेही वाचा: डॉ. गुलेरिया म्हणतात, नाईट कर्फ्यू-वीकेंड लॉकडाउनचा उपयोग नाही; तर...

दरम्यान, एप्रिल आणि मे मधील जेईई परीक्षेची सेशन्स ही पुढील काळात अनुक्रमे घेतली जातील. यामुळे मे महिन्याच्या परीक्षेसाठीची नोंदणीबाबतही येत्या काळात घोषणा करण्यात येणार आहे. सुरुवातीचे दोन सेशन्स हे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पूर्ण करण्यात आले आहेत.