esakal | डॉ. गुलेरिया म्हणतात, नाईट कर्फ्यू-वीकेंड लॉकडाउनचा उपयोग नाही; तर...

बोलून बातमी शोधा

randeep guleria
डॉ. गुलेरिया म्हणतात, नाईट कर्फ्यू-वीकेंड लॉकडाउनचा उपयोग नाही; तर...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोना विषाणू (coronavirus) सातत्याने विकसित (evolve) होत असून आजवर या विषाणूचे अनेक स्ट्रेन्स आढळून आले आहेत. तसेच त्याचा प्रतिकारशक्तीवरही परिणाम होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट (corona third wave) येण्याची शक्यता आहे, असं मत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर काही राज्यांनी लावलेला नाईट कर्फ्यू (night curfew) आणि वीकेंड लॉकडाउन (weekend lockdown) याला काही अर्थ नाही, असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: अदर पूनावालांची युकेमध्ये २४० मिलियन पौंडची गुंतवणूक

देशातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन हाच पर्याय असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत गुलेरिया यांना विचारलं असता ते म्हणाले, "कोरोना विषाणूच्या संसर्गाची साळखी तोडण्यासाठी आवश्यक पुरेशा कालावधीचा लॉकडाउन गरजेचा आहे."

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा इशारा: अशी आहे मुंबईची तयारी

दरम्यान, तीन गोष्टींकडे सध्या लक्ष देणं महत्वाचं असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. ते म्हणाले, "यामध्ये पहिली बाब म्हणजे रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, दुसरी बाब म्हणजे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करण्याकडं तीव्रतेनं लक्ष देणं आणि तिसरी बाब म्हणजे लसीकरण मोहिम वेगानं राबवणं ही होय. आपल्याला विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडावयाची आहे. जर आपण व्यक्तींमधील जवळचा संपर्क कमी केला तर कोरोनाचा प्रसार कमी होईल."

सन १९१८च्या महामारीचा दिला दाखला

गुलेरिया पुढे म्हणाले, "जर तुम्ही १९१८ची महामारी पाहिली तर तुमच्या हे लक्षात येईल की, त्यावेळी देखील दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा खूपच भयानक होती. त्यावेळीही मनुष्याला आपल्या वागणुकीत बदल करणं गरजेचं होतं मात्र त्यात आपण अपयशी ठरलो होतो. आपण त्या महामारीशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार नव्हतो आणि आपल्याकडे लसीकरणंही झालं नव्हतं. पण सध्याची लाट ही त्यावेळेसारखी तीव्र नाही."