मांझी यांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार; हिंदू संघटना आक्रमक

Jeetanram Manjhi
Jeetanram ManjhiJeetanram Manjhi

बिहारचे (bihar) माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी (Jeetanram Manjhi) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर (Controversial statement) हिंदू संघटनांकडून (Hindu organizations) संताप व्यक्त होत आहे. मांझी यांच्या वक्तव्यावर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांच्या घराबाहेर यज्ञ केला. समाजात संतापाचे वातावरण असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

जीतनराम मांझी यांनी नुकतेच ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान (Controversial statement) केले आहे. मांझी यांच्या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली होती. विशेषतः: ब्राह्मण समाजाशी संबंधित संघटना आणि नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. हिंदुत्ववादी संघटनेच्या (Hindu organizations) लोकांनी मांझी यांच्या निवासस्थानापासून काही मीटर अंतरावर भगवान सत्यनारायण यांची पूजा केली.

Jeetanram Manjhi
शाळेत मुलाने लिहिलेले वाक्य पाहून शिक्षिकेला बसला धक्का

हिंदू पुत्र संघटना आणि श्री रामसेनेच्या लोकांनी मांझी यांचे निवासस्थान गंगाजलाने शुद्ध करण्याची धमकी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर जीतनराम मांझी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मांझी यांनी पंडित दलितांकडे येतात आणि त्यांची पूजा करतात; परंतु, त्यांच्या घरचे अन्न खात नाहीत. हेच पंडित गरीब लोकांसोबत जेवण घेत नाहीत, तर त्यांच्याकडून रोख पैसे घेतात, असा आरोपही मांझी (Jeetanram Manjhi) यांनी केला होता.

जीतनराम मांझी यांनी ब्राह्मणांबद्दल दिलेल्या वादग्रस्त विधानाचा (Controversial statement) परिणाम असा झाला की, त्यांच्याविरोधात बिहारमधील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आणि न्यायालयात तक्रारी दाखल झाल्या आहेत. सोबतच त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ब्राह्मणांना शिवीगाळ केल्यानंतर मांझी (Jeetanram Manjhi) यांनी माफी मागितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com