esakal | जीतनराम मांझी एनडीएच्या साथीला
sakal

बोलून बातमी शोधा

Jitan-Ram-Manjhi

हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. मांझी यांचा पक्ष संयुक्त जनतादलामध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

जीतनराम मांझी एनडीएच्या साथीला

sakal_logo
By
पीटीआय

पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. मांझी यांचा पक्ष संयुक्त जनतादलामध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पक्षाचा विलय न करता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक बनण्याचे आज मांझी यांनी स्पष्ट केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नितीश यांच्यासह मांझी यांनी जागावाटपाबाबतही चर्चा केल्याचे समजते. मात्र ही चर्चा इतर विषयांवर होती, असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यातच त्यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा