

Jevar International Film City UP news
sakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' मानली जाणारी जेवर येथील इंटरनॅशनल फिल्म सिटी आता कागदावरून थेट जमिनीवर उतरताना दिसत आहे. या फिल्म सिटीत चित्रीकरण होणारा पहिला चित्रपट म्हणून 'मॉम-२' (Mom-2) चे नाव निश्चित झाले आहे.
नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या यमुना एक्सप्रेसवेच्या सेक्टर-२१ मध्ये ही भव्य फिल्म सिटी साकारली जात आहे. विशेष म्हणजे, या फिल्म सिटीच्या बांधकामाचे भूमिपूजन होण्यापूर्वीच तिथे चित्रपटाच्या चित्रीकरणाची लगबग सुरू झाली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि भूटानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या फिल्म सिटीचे काम वेगाने सुरू आहे.