esakal | सलाम! दोन मुली अन् पत्नीला कोरोना, तरीही 'तो' लोकांसाठी झटतोय

बोलून बातमी शोधा

सलाम! दोन मुली अन् पत्नीला कोरोना, तरीही 'तो' लोकांसाठी झटतोय
सलाम! दोन मुली अन् पत्नीला कोरोना, तरीही 'तो' लोकांसाठी झटतोय
sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भयावह होत चाललाय. आरोग्य सुविधांच्या तुटवड्यामुळे अनेंकाना आपला जीवही गमावावा लागलाय. कोरोनाबाधित रुग्णांची परवड होत आहे. अनेक निवृत्त डॉक्टर पुन्हा सेवेत परतले आहेत. तर काहीजण आपलं कुटुंबसोडून रुग्णांची सेवा करण्याला प्राधान्य देत आहेत. कोरोना संकटात कुटुंबाला सोडून अनेक कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशा कोरोना योद्ध्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अशाच अनन्यसाधारण आपल्या कर्तुत्वामुळे सध्या उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती चर्चेत आहे. हा कोणी डॉक्टर नाही तर झाशीचे जिल्हाधिकारी आहे.

झाशीचे जिल्हाधिकारी आंद्रा वामसी कोरोनाच्या लढ्यात सर्वात पुढे होऊन लोकांची मदत करत आहे. आंद्रा वामसी यांच्या दोन्ही मुली आणि पत्नीही कोरोनाबाधित आहेत. अशावेळी आपल्या कुटुंबासोबत राहण्याऐवजी आंद्रा वामसी कर्तव्यावर आहेत. त्यांच्या निर्णायामुळे सोशल मीडियावर आणि झांशीमध्ये कौतुक होत आहे.

झांशी येथील मेडकिल कॉलेजमधील सुपर स्पेशलिस्ट बिल्डिंगमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वार्डमध्ये आंद्रा वामसी स्वत पीपीई कीट घालून पोहचले होते. आंद्रा वामसी दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. कुटुंब कोरोनाशी लढत असतानाही आंद्रा वामसी यांनी जनतेला प्राधान्य दिलं. आंद्रा वामसी यांनी पीपीई कीट घालून रुग्णालयातील सेवा व्यवस्थित आहेत का? याची चौकशी केली. रग्णांना मिळणाऱ्या उपचारापासून ते जेवणापर्यंत त्यांनी सर्व बाबांची जातीनं पडताळणी केली.