

Historic Parichha Dam on the Betwa River in Jhansi, Uttar Pradesh.
Sakal
बुंदेलखंडच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या झाशीच्या पारीछा बांधाला 'WHIS अवॉर्ड-२०२६' जाहीर झाला आहे. आगामी १४ ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील मार्सेई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात १२० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या ऐतिहासिक बांधाचा गौरव करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे झाशी आणि संपूर्ण बुंदेलखंडच्या पर्यटन क्षमतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.