
तरुणी मित्राला लग्नपत्रिका देण्यासाठी तेहरौली इथं गेली असता, तीन तरुणांनी तिचं अपहरण केलं.
विद्यार्थिनीचं अपहरण करुन मध्य प्रदेशात विक्री; BSP नेत्यासह चौघांवर गुन्हा
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी इथं एका विद्यार्थिनीनं बहुजन समाज पार्टी (BSP) बुंदेलखंडचे प्रभारी लालाराम अहिरवार यांच्यावर लग्नाच्या तीन दिवस आधी अपहरण केल्याचा आरोप केलाय. बसपा नेत्यानं तिचं अपहरण करून आपल्या फार्म हाऊसमध्ये डांबून ठेवल्याचा दावाही विद्यार्थिनीनं केलाय. विद्यार्थिनीनं दिलेल्या माहितीच्या आधारे, उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) बसपा नेते लालाराम अहिरवार (BSP leader Lalaram Ahirwar) यांच्यासह चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
दरम्यान, 21 एप्रिल रोजी पीडित मुलीचं लग्न होणार होतं, त्यामुळं 18 एप्रिलला ती तरुणी तिच्या मित्राला लग्नपत्रिका देण्यासाठी तेहरौली इथं गेली असता, तीन तरुणांनी तिचं अपहरण केलं. मध्य प्रदेशमधील टिकमगड जिल्ह्यातील बसपा नेते लालाराम अहिरवार, नीरज आणि अंकित यांनी तिचं अपहरण केल्याचा आरोप विद्यार्थिनीनं केलाय.
हेही वाचा: 'त्या वक्तव्यांवर लोक हसतात, त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत'
तीन दिवस तिला राजगड येथील लालाराम अहिरवार यांच्या घरी ठेवलं आणि नंतर मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील (Datia District) पठारी इथं राहणाऱ्या आशुला विकलं. विद्यार्थिनी घरी न पोहोचल्यामुळं कुटुंबीयांनी तेहरौली पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, मुलीचा शोध लागला नाही. विद्यार्थिनीला ज्या ठिकाणी विकलं होतं, तेथून मुलीनं चतुराईनं मोबाईलवरून वडिलांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर मुलीच्या वडिलांनी कुटुंबीयांसह दतिया जिल्ह्यातील पाथरी गावात पोहोचून आपल्या मुलीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवून घरी आणलं. त्यानंतर वडिलांनी तेहरौली पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विद्यार्थिनीचा न्यायालयात जबाब नोंदवलाय.
Web Title: Jhansi Student Accuses Bsp Leader Of Kidnapping Three Days Before Marriage Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..