Jhansi Suspicious Death : 'हॅपी बर्थडे'च्या दुसऱ्याच दिवशी विवाहितेचा गूढ मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवलेला मृतदेह पोलिसांनी खेचला बाहेर!

झाशीमध्ये ३६ वर्षीय मंजू अहिरवार यांच्या मृत्यूवरून खळबळ; दुसऱ्या पतीवर हत्येचा संशय, माहेरच्यांच्या तक्रारीनंतर स्मशानभूमीत पोलिसांची धाव
Suspicious Death of Married Woman in Jhansi, Body Pulled Out from Pyre

Suspicious Death of Married Woman in Jhansi, Body Pulled Out from Pyre

Sakal

Updated on: 

झाशी : आदल्या दिवशी कुटुंबीयांसोबत हसतमुखाने केक कापून वाढदिवस साजरा केला; मात्र अवघ्या २४ तासांत ३६ वर्षीय विवाहितेचा घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी घाईघाईने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेला असतानाच, माहेरच्या नातेवाइकांनी हत्येचा आरोप करत पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी थेट स्मशानभूमीत पोहोचून पेटण्याआधीच अंत्यविधी थांबवला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com