Jharigaon Court Attack : न्यायालयाच्या आवारात महिलेचा राडा; न्यायाधीश, सरकारी वकील अन् पोलीस कर्मचाऱ्यावर केला लोखंडी सळईने हल्ला

Odisha Court Security : आरोपी कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात पक्षकार होती आणि नुकतीच तिची साक्ष नोंदवण्यात आली होती. तिने सहाय्यक सरकारी वकील प्रदीप पटनायक यांच्यावर हल्ला करून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत केली, ज्यामुळे टाके घालावे लागले.
Woman Attacks Magistrate, Prosecutor and Police Officer

Woman Attacks Magistrate, Prosecutor and Police Officer

esakal

Updated on: 

ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील झारीगाव येथील न्यायालयाच्या आवारात शनिवारी (८ नोव्हेंबर) धक्कादायक घटना घडली. एका महिलेने लोखंडी सळईने महिला दंडाधिकारी, सहाय्यक सरकारी वकील आणि पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर महिलेला अटक केली असून न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...