

Jharkhand Accident Six From Same Family Dead
Esakal
झारखंडमध्ये एका विचित्र अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारीबाग जिल्ह्यातील चौपारण इथं दनुआ घाटीत ही दुर्घटना घडली. महेशपूर कोलियारी इथं लाइनमन असलेले शिवकुमार हे त्यांच्या कुटुंबासोबत एका लग्नसोहळ्यासाठी निघाले होते. त्यांच्या कारने एका कंटेनरला मागून धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने कारला धडक दिली आणि दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा झाला. Family Killed in Major Highway Accident