

jharkhand aids control health
esakal
झारखंड : एचआयव्ही आणि एड्स नियंत्रणाच्या राष्ट्रीय मोहिमेत झारखंडमधील तीन जिल्ह्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. सरायकेला-खरसावा, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंज या जिल्ह्यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (NACO) निश्चित केलेले ‘ट्रिपल ९५ टक्के’ उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांचा ‘सेफ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तपासणी, उपचार आणि जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे.
झारखंड स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीचे प्रकल्प संचालक शशी प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जिल्ह्यांची कामगिरी उत्साहवर्धक असली, तरी राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांमध्ये एचआयव्ही नियंत्रणाचे निर्धारित निकष पूर्ण करणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.