आता काँग्रेसने मागितले उपमुख्यमंत्रिपद

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

काँग्रेसला झारखंडमध्ये मोठे यश मिळालेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालेच पाहिजे. जनतेने मोठ्या आशेने आम्हाला निवडून दिले आहे. आताच मंत्रिमंडळाबाबत बोलणे योग्य नाही.

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) आघाडीला मोठे यश मिळाले असून, जेएमएमचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेस आघाडीने झारखंड निवडणुकीत 47 जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री रघुबर दास यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. आता सत्तेत आलेल्या आघाडीकडून हेमंत सोरेन यांचे मुख्यमंत्रीपदावर नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर, काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे.

झारखंडमध्ये काँग्रेसचा विजय अन् राहुल समर्थकांना दिलासा 

सहाय म्हणाले, की काँग्रेसला झारखंडमध्ये मोठे यश मिळालेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालेच पाहिजे. जनतेने मोठ्या आशेने आम्हाला निवडून दिले आहे. आताच मंत्रिमंडळाबाबत बोलणे योग्य नाही. आमच्या महाआघाडीवर मोठी जबाबदारी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand assembly election results Congress subodhkant sahay asked for deputy cm in Jharkhand